मोफत साडी योजना २०२४: रेशन दुकानावर धान्यासोबतच आता साड्याही मिळणार आहेत. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी रेशन दुकानावर एक मोफत साडी मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकारने ठरवून दिलेल्या सणासुदीच्या दिवशी या साड्यांचे वाटप केले जाणार आहे.
रेशन कार्डवर मोफत साडी योजना –
चैत्र पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी सणांना अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रेशन दुकानातून मोफत साड्या देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा शासन आदेश शुक्रवारी जारी केला आहे. राज्यातील 24 लाख 58 हजार 747 अंत्योदय कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही योजना राज्य यंत्र महामंडळामार्फत राबविण्यात येणार आहे. 2023-24 या वर्षासाठी महामंडळ एक साडी 355 रुपयांना खरेदी करणार आहे.
मोफत साडी योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक, साठवणूक आणि वितरण यावरील सर्व खर्च राज्य सरकार महामंडळाला देण्यात येणार आहे. वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण जाहीर केले आहे. या धोरणाप्रमाणे ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेली आहे. राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या 24 लाख 58 हजार 747 आहे. या सर्व कुटुंबांना पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी एक साडी मोफत वाटली जाईल.
वस्त्रोद्योग विभागाची पाच वर्षांची मोफत साडी योजना –
वस्त्रोद्योग विभागाने (महाराष्ट्र शासन) एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण जाहीर केले आहे. याच धोरणाप्रमाणे ही योजना २०२३ ते २०२८ पर्यंत पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेली आहे. रेशन कार्डवर मोफत साडी मिळणार आहे.
राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या २४ लाख ५८ हजार ७४७ आहे. या सर्व कुटुंबांना पुढील पाच वर्षांसाठी (महाराष्ट्र शासन) दरवर्षी एका साडीच्या स्वरूपात मोफत साड्यांचे वाटप केले जाईल.
मोफत साडी योजनेसाठी राज्य सरकारकडून निधी –
राज्य यंत्र महामंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. 2023-24 या वर्षासाठी महामंडळ एक साडी 355 रुपयांना खरेदी करत आहे. यामध्ये साड्यांच्या उत्पादनापासून ते वाहतूक, साठवणूक यासह प्रसिद्धीपर्यंतचा सर्व खर्च राज्य सरकारकडून महामंडळाला दिला जातो. मोफत साडी अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे.
मोफत साडी योजनेचा कालावधी किती आहे?
वस्त्रोद्योग विभागाने आपले शाश्वत धोरण जाहीर केले आहे. यामध्ये 2023 ते 2028 या कालावधीत योजनेचा लाभ मिळणार आहे. अंत्योदय रेशन कार्ड म्हणजे पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. राज्यात एकूण २४ लाख ५८ हजार ७४७ कुटुंबे अंत्योदय शिधापत्रिका वापरतात. ज्या लोकांकडे ही कार्डे आहेत त्यांच्या महिलांना वर्षातून एकदा सुंदर साडी मिळेल.
1 thought on “मोफत साडी योजना २०२४: रेशन दुकानांवर मोफत साड्या मिळणार; राज्य सरकारची महिलांसाठी मोठी भेट”